यूपीएससी एनडीए व नेव्हल अकादमी परीक्षा (I) २०२६ साठी ऑनलाइन अर्ज;

0
84
यूपीएससी एनडीए व नेव्हल अकादमी परीक्षा (I) २०२६ साठी ऑनलाइन अर्ज;
यूपीएससी एनडीए व नेव्हल अकादमी परीक्षा (I) २०२६ साठी ऑनलाइन अर्ज;

यूपीएससी एनडीए व नेव्हल अकादमी परीक्षा (I) २०२६ साठी ऑनलाइन अर्ज; ३० डिसेंबरपर्यंत संधी

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) मार्फत नॅशनल डिफेन्स अकादमी (NDA) आणि नेव्हल अकादमी परीक्षा (I) २०२६ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही परीक्षा एनडीएच्या १५७ व्या अभ्यासक्रम आणि ११९ व्या इंडियन नेव्हल अकादमी अभ्यासक्रम (INAC) अंतर्गत लष्कर, नौदल व वायुदल विभागांमध्ये प्रवेशासाठी आयोजित केली जाणार असून, अभ्यासक्रम १ जानेवारी २०२७ पासून सुरू होणार आहेत.

या परीक्षेमार्फत उमेदवारांची निवड भारतीय सैन्य, नौदल आणि वायुदलात अधिकारी म्हणून प्रवेशासाठी करण्यात येणार आहे. अर्ज प्रक्रियेबाबत रिक्त जागा, पात्रता निकष, वयोमर्यादा, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, निवड प्रक्रिया तसेच महत्त्वाच्या तारखा यासंबंधी सविस्तर माहिती आयोगाने उपलब्ध करून दिली आहे.

UPSC NDA व NA (I) २०२६ साठी ऑनलाइन नोंदणी १० डिसेंबर २०२५ पासून सुरू होऊन ३० डिसेंबर २०२५ रोजी समाप्त होणार आहे. इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन सविस्तर अधिसूचना (PDF) वाचून ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन आयोगाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here