उरण नगर परिषदेच्या वाचनालयास नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांची भेट; सोयी-सुविधांची केली पाहणी

0
84

प्रतिनिधी :
उरण नगर परिषदेच्या वाचनालयास नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी भेट देऊन तेथील सोयी-सुविधांची पाहणी केली. या भेटीदरम्यान त्यांनी वाचनालयात अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांशी तसेच नियमित वाचकांशी प्रत्यक्ष संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि समस्या जाणून घेतल्या.

वाचनालयातील जागा, बसण्याची व्यवस्था, प्रकाश व्यवस्था, वाचनासाठी उपलब्ध पुस्तके तसेच इतर मूलभूत सुविधांची त्यांनी सखोल पाहणी केली. विद्यार्थ्यांनी अभ्यासादरम्यान येणाऱ्या अडचणी, सुविधा अपुऱ्या पडत असल्याबाबतच्या सूचना आणि अपेक्षा नगराध्यक्षांसमोर मांडल्या.

यावेळी नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी वाचनालयातील त्रुटी आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर लवकरच सकारात्मक तोडगा काढण्यात येईल, असे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी अधिक अनुकूल वातावरण मिळावे यासाठी आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारे वाचनालय हे ज्ञानमंदिर आहे. या ज्ञानमंदिराचा सर्वांगीण कायापालट करून ते अधिक सुसज्ज आणि आधुनिक बनवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे नगराध्यक्ष भावनाताई घाणेकर यांनी यावेळी सांगितले.

या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत असून, वाचनालयाच्या विकासासाठी नगर परिषदेच्या वतीने ठोस पावले उचलली जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here