सुनिता भाईप / सावंतवाडी
सावंतवाडी: वाफोली अन्नपूर्णावाडी ते खोतवाडी रस्ता गेले अनेक वर्ष खड्डेमय होता.सरपंच उमेश शिरोडकर व उपसरपंच विनेश गवस यांनी सातत्याने पाठपुरावा करत सदर रस्त्यासाठी निधीची मागणी केली होती.सदर रस्ता जनसुविधा योजने अंतर्गत निधीतून मंजूर करून आणला हा रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात आला.श्रीफळ फोडून सदर रस्त्याचे उद्घाटन वाफोली सरपंच श्री उमेश शिरोडकर यांच्या हस्ते झाले. https://sindhudurgsamachar.in/kokan-जिल्ह्यातील-सर्वोत्कृष
यावेळी सरपंच श्री.शिरोडकर व उपसरपंच श्री. गवस यांनी सांगितले कीजी कामे प्रलंबित आहेत ती लवकरात लवकर पूर्ण करू असे आश्वासन त्यांनी उपस्थितांना दिले.याप्रसंगी सरपंच श्री उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस,देवस्थान समिती अध्यक्ष श्री विलास गवस,पोलीस पाटील श्री आना भदू गवस,ग्रामपंचायत सदस्या सौ.मंजुळा शेगडे,ग्रामसेवक प्रसाद ठाकूर,तुलसीदास गवस,परेश गवस,प्रदीप आयकर,सुनील कलंगुटकर आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी अन्नपूर्णावाडी सह खोतवाडीतील ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.