महाबळेश्वर तालुक्यातील दरे येथे श्री क्षेत्र उत्तेश्वर यात्रेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उपस्थिती

0
80

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील दरे या त्यांच्या मूळगावी ग्रामदैवत श्री क्षेत्र उत्तेश्वर यांच्या यात्रेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी श्री उत्तेश्वराचे सहकुटुंब मनोभावे पूजन करून भक्तिभावाने दर्शन घेतले.

यानिमित्ताने ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात सहभागी होत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. कोयना नदीच्या पात्राजवळ वसलेले दरे गाव आता विकासाच्या नव्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

कोयना नदीवर उभारण्यात येणारा पूल अंतिम टप्प्यात असून, तो पूर्ण झाल्यानंतर कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र अधिक जवळ येणार आहेत. यामुळे दळणवळण अधिक सोपे व सुलभ होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, कोयना नदीच्या पात्रात वॉटर स्पोर्ट्स सुरू झाल्याने स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. तसेच नवीन महाबळेश्वर प्रकल्प साकार होत असून, यामुळे भविष्यात मुंबई-पुण्याकडे स्थलांतर न करता स्थानिक पातळीवरच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

श्री क्षेत्र उत्तेश्वर मंदिर परिसर विकासाचे कामही प्रगतीपथावर असून, या विकासामुळे भाविकांसाठी ये-जा अधिक सुलभ होणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाला मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली श्रीकांत शिंदे यांच्यासह स्थानिक शिवसेना पदाधिकारी तसेच दरे गावातील ग्रामस्थ बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here