महाराष्ट्राचे नवे पोलीस महासंचालक म्हणून सदानंद दाते यांनी पदभार स्वीकारला

0
81

मुंबई प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक मा. रश्मी शुक्ला यांचा आज कार्यकाळ पूर्ण झाला. त्यांच्या पश्चात १९९० तुकडीचे भारतीय पोलीस सेवेतील (भा.पो.से.) वरिष्ठ अधिकारी श्री. सदानंद दाते यांनी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून अधिकृतपणे पदभार स्वीकारला आहे.

प्रशासकीय आणि पोलीस सेवेत दीर्घ अनुभव असलेले श्री. सदानंद दाते यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पोलीस दल अधिक सक्षम, कार्यक्षम आणि आधुनिक पद्धतीने काम करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here