मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सिंगापुर ग्रामपंचायतीत विकास कामांना गती

0
90

ठाणे l प्रतिनिधी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या अनुषंगाने दि. ०२ जानेवारी २०२६ रोजी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी मुरबाड तालुक्यातील सिंगापुर (जि. ठाणे) ग्रामपंचायतीस भेट दिली. या भेटीदरम्यान अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध विकासात्मक उपक्रमांचे उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले.

ग्रामस्थांमध्ये वाचनसंस्कृती वाढावी, या उद्देशाने उभारण्यात आलेल्या “सुसज्ज व सुविधायुक्त वाचनालयाचे” उद्घाटन व लोकार्पण मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या वाचनालयामुळे विद्यार्थ्यांसह सर्व ग्रामस्थांना ज्ञानवृद्धीसाठी एक उपयुक्त व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.

या कार्यक्रमाला पंचायत समिती मुरबाडच्या गटविकास अधिकारी लता गायकवाड, विस्तार अधिकारी (ग्रामपंचायत) मोतीराम भोये व लक्ष्मण सुरोशे, सिंगापुर ग्रामपंचायतीचे सरपंच देवराम वाघ, ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश कोळी, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, सीआरपी, महिला बचतगट सदस्य, आशा सेविका, अंगणवाडी सेविका तसेच सिंगापुर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या माध्यमातून ग्रामपंचायती अधिक सक्षम, समृद्ध व आत्मनिर्भर करण्याच्या दिशेने सिंगापुर ग्रामपंचायतीत उचललेले हे पाऊल महत्त्वाचे असल्याचे यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी नमूद केले.

One attachm

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here