महापालिका निवडणुकीमुळे प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई (मध्य) १४ व १५ जानेवारीला बंद
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय, मुंबई (मध्य) हे कार्यालय बुधवार, १४ जानेवारी २०२६ आणि गुरुवार, १५ जानेवारी २०२६ रोजी बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांचे प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कोणतेही नियमित कामकाज होणार नाही, अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली आहे.


