महिलांच्या सुरक्षेसाठी आस्थापनांना ‘SHEBOX’ पोर्टलवर नोंदणी अनिवार्य

0
75
महिलांच्या सुरक्षेसाठी आस्थापनांना ‘SHEBOX’ पोर्टलवर नोंदणी अनिवार्य
महिलांच्या सुरक्षेसाठी आस्थापनांना ‘SHEBOX’ पोर्टलवर नोंदणी अनिवार्य

महिलांच्या सुरक्षेसाठी आस्थापनांना ‘SHEBOX’ पोर्टलवर नोंदणी अनिवार्य
जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांचे आवाहन

मुंबई l प्रतिनिधी

कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने केंद्र सरकारने ‘SHEBOX’ (Sexual Harassment Electronic Box) हे ऑनलाईन पोर्टल सुरू केले असून, सर्व आस्थापनांनी या पोर्टलवर आपली नोंदणी करणे बंधनकारक आहे. मुंबई उपनगरातील सर्व शासकीय, निमशासकीय व खासगी आस्थापनांनी तात्काळ SHEBOX पोर्टलवर कार्यालयाची तसेच अंतर्गत तक्रार निवारण समितीची अद्ययावत माहिती सादर करावी, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (मुंबई उपनगर) एस. टी. कुऱ्हाडे यांनी केले आहे.

कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण, प्रतिबंध व निवारण अधिनियम २०१३ नुसार, १० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या प्रत्येक आस्थापनात अंतर्गत तक्रार निवारण समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. या अधिनियमाच्या कलम १९ अंतर्गत कार्यालय प्रमुखांची जबाबदारी निश्चित करण्यात आली असून, समिती स्थापन न केल्यास किंवा कायद्याच्या तरतुदींचे उल्लंघन केल्यास कलम २६ नुसार रुपये ५० हजारांपर्यंत दंडाची तरतूद आहे.

(अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, मुंबई उपनगर, प्रशासकीय इमारत, पहिला मजला, दुसरा टप्पा, आर.सी. मार्ग, चेंबूर, मुंबई–७१ येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०२२-२५२३२३०८ तसेच ई-मेल [email protected] यावर संपर्क साधावा, असेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here