बिनविरोध निवडणुकांवर मनसेचा सवाल

0
129
बिनविरोध निवडणुकांवर मनसेचा सवाल
बिनविरोध निवडणुकांवर मनसेचा सवाल

बिनविरोध निवडणुकांवर मनसेचा सवाल
निवडणूक आयोगाला माजी आमदार राजू पाटील यांचा थेट प्रश्न

मुंबई l प्रतिनिधी

बिनविरोध निवडणुकांच्या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी आमदार राजू पाटील यांनी निवडणूक आयोगाला थेट सवाल केला आहे.

राजू पाटील म्हणाले की, “जर XYZ नावाच्या उमेदवाराने आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला नसेल आणि बॅलेट युनिटवर त्या उमेदवारासह ‘NOTA’ हा पर्याय उपलब्ध असेल, तर अशा परिस्थितीत XYZ उमेदवार बिनविरोध निवडून आला, असे कसे म्हणता येईल?”

पुढे ते म्हणाले की, मतदारांना पर्याय निवडण्याचा हक्क असताना त्यांना मतदानापासून वंचित ठेवणे हे लोकशाहीच्या मूलभूत तत्त्वांना धरून नाही. जनतेचा निवडीचा अधिकार नाकारून बिनविरोध निवडणुका जाहीर करणे योग्य ठरत नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here