मालवणमध्ये शिवसेना महिला आघाडीतर्फे पाककला स्पर्धेचे आयोजन
मालवण l प्रतिनिधी
शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख देवदत्त (दत्ता) सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त मालवण शहर शिवसेना महिला आघाडीच्या वतीने शहर मर्यादित पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांमधील पाककौशल्याला व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच पौष्टिक आहाराबाबत जनजागृती करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
ही पाककला स्पर्धा बुधवार, दि. ७ जानेवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण येथील हॉटेल कोणार्क नजीक असलेल्या महायुती संपर्क कार्यालयात होणार आहे. स्पर्धेचा विषय “तांदळापासून पौष्टिक पदार्थ” असा असून, सहभागी स्पर्धकांनी तांदळावर आधारित नाविन्यपूर्ण आणि आरोग्यदायी पदार्थ सादर करायचे आहेत.
स्पर्धेसंबंधी अधिक माहिती किंवा नावनोंदणीसाठी विद्या फर्नांडिस (७७६७०३३३६४), प्रियांका मेस्त्री (९३५६५२०२८०), मार्टीना फर्नांडिस (८३९०६७४७५६), चित्रा हरमलकर (८८५७०४२६२८), प्रमिला मोर्जे (८४११८४६६८५) तसेच देवयानी शिर्सेकर (७०३०४५६८५५) यांच्याशी संपर्क साधावा, असे आयोजकांनी कळविले आहे.
या स्पर्धेत मालवण शहरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.


