शिष्यवृत्ती सराव परीक्षेत दुर्वा कोळेकरचा तालुक्यात तृतीय क्रमांक

0
32
शिष्यवृत्ती सराव परीक्षेत दुर्वा कोळेकरचा तालुक्यात तृतीय क्रमांक
शिष्यवृत्ती सराव परीक्षेत दुर्वा कोळेकरचा तालुक्यात तृतीय क्रमांक

शिष्यवृत्ती सराव परीक्षेत दुर्वा कोळेकरचा तालुक्यात तृतीय क्रमांक

वैभववाडी l प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, सिंधुदुर्ग यांच्या वतीने गुरुवार दि. १५ जानेवारी २०२६ रोजी शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेत विद्यामंदिर नाधवडे ब्राह्मणदेव नवलादेवीवाडी येथील विद्यार्थिनी दुर्वा कोळेकर हिने वैभववाडी तालुक्यात तृतीय क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे शाळेचे नाव उज्वल झाले आहे.

या यशाबद्दल शाळा समितीचे चेअरमन बाप्पी मांजरेकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व नाधवडे गावचे उपसरपंच गोपाळ उर्फ प्रफुल्ल कोकाटे, उपाध्यक्ष श्रीमती कांबळे, माजी जि. प. सदस्य सुधीर नकाशे, वैभववाडी तालुक्याचे माजी उपसभापती दिगंबर उर्फ बंड्या मांजरेकर, माजी सरपंच सूर्यकांत कांबळे, शैलजा पांचाळ, नाना बंड, बाबा कोकाटे तसेच शाळेचे मुख्याध्यापक संजय पाताडे, पदवीधर शिक्षक पंढरीनाथ सावंत, संदीप कोळेकर, सुजाता कुडतरकर यांनी दुर्वा कोळेकर व यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here