सावंतवाडी रोड स्थानकावर २६ जुलैपासून सहा गाड्यांना प्रायोगिक थांबा; प्रवाशांना मोठा दिलासा
प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीत कोकण मार्गावर विशेष रेल्वे गाड्या
प्रजासत्ताक दिनानिमित्त २३ ते २६ जानेवारीच्या दीर्घ सुट्टीत मुंबई व पुण्याहून कोकण आणि सिंधुदुर्गकडे जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर कोकण विकास समितीने कोकण मार्गावर विशेष रेल्वे गाड्या सुरू करण्याची मागणी केली आहे. नियमित गाड्यांची तिकिटे आधीच संपत असल्याने प्रवाशांना अडचणी येतात. प्रस्तावित विशेष गाड्यांमध्ये मुंबई सीएसएमटी–सावंतवाडी रोड, पुणे–सावंतवाडी रोड आणि मुंबई सीएसएमटी–चिपळूण दिवसाची विशेष गाडी यांचा समावेश असून, स्लीपर, एसी तसेच आसन व्यवस्था असलेली रचना सुचविण्यात आली आहे.
प्रस्तावित विशेष गाड्या
मुंबई सीएसएमटी – सावंतवाडी रोड – मुंबई सीएसएमटी थांबे : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप आदी. रचना : स्लीपर, एसी ३ – टियर, एसी २ – टियर. पुणे – सावंतवाडी रोड – पुणे थांबे : चिंचवड, लोणावळा, कर्जत, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आदी. रचना : स्लीपर, एसी ३ – टियर, एसी २ – टियर. मुंबई सीएसएमटी – चिपळूण – मुंबई सीएसएमटी (दिवसाची विशेष गाडी) थांबे : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, कोलाड, माणगाव, खेड, अंजनी आदी. रचना : द्वितीय श्रेणी आसन व्यवस्था व वातानुकूलित खुर्ची कार.