सावंतवाडी मळगाव डंपर चोरी प्रकरणात फरार आरोपी पुण्यातून अटक

0
47
डंपर चोरी प्रकरणात फरार आरोपी पुण्यातून अटक
डंपर चोरी प्रकरणात फरार आरोपी पुण्यातून अटक

सावंतवाडी मळगाव डंपर चोरी प्रकरणात फरार आरोपी पुण्यातून अटक
फरार आरोपी पुण्यातून अटकेत, तीन दिवसांची पोलिस कोठडी

बातमी (News Copy):
सावंतवाडी : मार्च 2024 मध्ये मळगाव येथून झालेल्या डंपर चोरी प्रकरणाच्या तपासात सावंतवाडी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील फरार असलेला दुसरा आरोपी धनाजी नागनाथ लोकरे (वय 35, रा. लवुळ, ता. माढा, जि. सोलापूर) याला पोलिसांनी पुणे येथून अटक केली आहे. आज त्याला न्यायालयात हजर केले असता, 20 जानेवारीपर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

सालईवाडा–सावंतवाडी येथील फिर्यादी अभिषेक सावंत यांचा डंपर मार्च 2024 मध्ये मळगाव येथून चोरीला गेला होता. याप्रकरणी सावंतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान पोलिसांनी 2024 मध्येच सुनील कोळेकर या पहिल्या आरोपीला अटक केली होती. त्याच्या चौकशीत सोलापूर परिसरातील आणखी तीन साथीदारांची नावे समोर आली होती. मात्र, ते सर्व आरोपी फरार होते.

गेल्या अनेक महिन्यांपासून सावंतवाडी पोलिस फरार आरोपींचा शोध घेत होते. दरम्यान, 16 जानेवारी रोजी गुन्ह्यातील सहभागी आरोपी धनाजी लोकरे हा पुणे येथे असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर, सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक (झडख) प्रमोद पाटील आणि हवालदार रामदास जाधव यांच्या पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

आज आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले असता, गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे. या चोरीच्या साखळीतील उर्वरित दोन फरार आरोपींचा शोध सुरू असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद पाटील करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here