जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे ऑनलाईन पद्धतीने देण्यास सुरुवात

0
62
जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे ऑनलाईन पद्धतीने देण्यास सुरुवात
जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे ऑनलाईन पद्धतीने देण्यास सुरुवात

जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे ऑनलाईन पद्धतीने देण्यास सुरुवात

नवी मुंबई महानगरपालिकेच्या ६८ लोकसेवा ऑनलाईन;

नवी मुंबई : नागरिकांना महानगरपालिकेशी संबंधित सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि जलद मिळाव्यात यासाठी नवी मुंबई महानगरपालिका कटिबद्ध असून, सध्या तब्बल ६८ लोकसेवा ऑनलाईन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यासोबतच आणखी ४९ महापालिकेच्या सेवा डिजिटल माध्यमातून नागरिकांच्या सेवेत आणण्यात आल्या असून, एकूण ११७ सेवा आता ऑनलाईन मिळत आहेत.

महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली नागरिकांना कार्यालयात प्रत्यक्ष येण्याची गरज भासू नये, यासाठी डिजिटल सेवा प्रणाली अधिक सक्षम करण्यात आली आहे. नागरिक www.nmmc.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून तसेच “माझी नवी मुंबई – My NMMC” या मोबाईल ॲपद्वारे सहजपणे या सेवांचा लाभ घेऊ शकतात.

यामध्ये जन्म नोंदणी आणि मृत्यू नोंदणी या अत्यंत महत्त्वाच्या सेवांचा समावेश आहे. सन २०२४ पासून महापालिकेने जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने देण्यास सुरुवात केली असून, अर्ज केल्यानंतर अवघ्या तीन दिवसांत ही प्रमाणपत्रे नागरिकांना उपलब्ध करून दिली जात आहेत.

जानेवारी ते डिसेंबर २०२५ या कालावधीत नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत एकूण १६,९०२ जन्म प्रमाणपत्रे ऑनलाईन वितरित करण्यात आली असून, ही सर्व प्रमाणपत्रे शासनाने ठरवून दिलेल्या तीन दिवसांच्या कालमर्यादेत देण्यात आली आहेत, ही बाब विशेष उल्लेखनीय आहे.

रुग्णालयात होणाऱ्या जन्म व मृत्यूच्या घटनांची नोंद संबंधित महापालिका विभाग कार्यालयात ऑनलाईन करणे रुग्णालयांना बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी प्रत्येक रुग्णालयाला https://dc.crsorgi.gov.in ही विशेष संगणक प्रणाली उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करून संबंधित व्यक्तीचा ई-मेल आणि मोबाईल क्रमांक नोंदवणे आवश्यक आहे.

रुग्णालयांकडून प्राप्त झालेल्या ऑनलाईन अर्जांची छाननी संबंधित विभाग कार्यालयात करण्यात येते. विहित शुल्काची आकारणी करून, सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तीन दिवसांच्या आत जन्म किंवा मृत्यू प्रमाणपत्र दिले जाते.

नवी मुंबई महानगरपालिकेने नागरिकांचे हित केंद्रस्थानी ठेवत पारदर्शक, कार्यक्षम आणि गतीमान प्रशासनाच्या दिशेने पाऊल टाकत एकूण ११७ सेवा ऑनलाईन उपलब्ध करून दिल्या असून, डिजिटल प्रशासनाचा आदर्श निर्माण केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here