साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यकर्त्यांचा जोशपूर्ण मेळावा
राज्यात होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुसेगाव येथील बालाजी मंगल कार्यालयात सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांचा उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी मेळावा आज पार पडला. या मेळाव्यात पक्षाच्या पुढील वाटचालीसाठी संघटन बळकटीकरणावर भर देण्यात आला.

या मेळाव्यास खासदार नितीन काका पाटील, आमदार प्रभाकरजी घार्गे, माजी आमदार प्रदीप विधाते, खटाव तालुक्याचे युवा नेते राहुल पाटील, पुसेगावचे गौरव जाधव, सागर भाऊ साळुंखे, तालुकाध्यक्ष ज्योतिनाना सावंत, युवा नेते साहिल बाबा शिंदे, डॉ. महेश पवार यांच्यासह माजी जिल्हा परिषद सदस्य कुदळे सर, तेजपाल वाघ, मानाजी काका, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अभिजित वाघ, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू कचरे सर, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव तसेच पक्षाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मेळाव्यात कार्यकर्त्यांमध्ये दिसून आलेली एकजूट, आत्मविश्वास आणि संघटनशक्ती पाहता, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चितच भक्कम आणि प्रभावी कामगिरी करेल, असा विश्वास यावेळी नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला. सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या एकत्रित प्रयत्नांतूनच पक्ष अधिक मजबूत होईल, तसेच जनतेच्या प्रश्नांसाठी एकदिलाने आणि ताकदीने लढण्याचा ठाम निर्धार या मेळाव्यातून व्यक्त करण्यात आला.


