नितीन नबीन यांची भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड
भाजपाचे लोकप्रिय नेते आणि यशस्वी कार्यकारी अध्यक्ष मा. आ. नितीन नबीनजी यांची भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल पक्षात आनंदाचे वातावरण असून, विविध स्तरांतून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
एक समर्पित कार्यकर्ता ते पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास हा परिश्रम, निष्ठा आणि संघटन कौशल्याचे जिवंत उदाहरण मानला जातो. संघटन बळकट करण्याची त्यांची क्षमता, कार्यकर्त्यांशी असलेली जवळीक आणि निर्णयक्षम नेतृत्वशैली यामुळे ते पक्षातील विश्वासार्ह चेहरा म्हणून ओळखले जातात.
मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नितीन नबीन यांच्या कुशल नेतृत्वात भाजपाचे संघटन अधिक प्रभावी, गतिमान आणि सर्वसमावेशक होईल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. त्यांच्या नव्या जबाबदारीसाठी आणि आगामी कार्यकाळासाठी त्यांना सर्वत्र मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.


