२९ महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत २२ जानेवारीला
मुंबई : राज्यातील २९ महानगरपालिकांमधील महापौर पदासाठी आरक्षण सोडत गुरुवार, २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. ही सोडत मुंबई येथील मंत्रालयातील परिषद सभागृहात (६ वा मजला) पार पडणार आहे.
या आरक्षण सोडतीची अध्यक्षता माननीय राज्यमंत्री (नगर विकास विभाग) करणार आहेत. सदर सोडतीद्वारे संबंधित महानगरपालिकांमधील महापौर पदासाठी महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागास प्रवर्गांसाठी आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे.
महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या सोडतीकडे सर्व राजकीय पक्षांचे आणि इच्छुक उमेदवारांचे विशेष लक्ष लागले असून, यामुळे स्थानिक राजकारणाला वेग येण्याची शक्यता आहे. आरक्षण जाहीर झाल्यानंतर महापौर पदाच्या दावेदारीसाठी हालचालींना अधिक गती मिळणार असल्याचे चित्र आहे.


