गंगापूर धरणावरील बोट क्लबमध्ये गिरीश महाजन यांची स्पीड बोट रायडिंग
नाशिक येथील गंगापूर धरणावरील बोट क्लबमध्ये राज्याचे जलसंपदा मंत्री तथा नाशिक कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी स्पीड बोट रायडिंगचा मनमुराद आनंद घेतला. वेग, थरार आणि उत्साहाने भरलेला हा अनुभव उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला.
यावेळी बोट क्लबच्या सुविधांची माहिती घेत मंत्री महाजन यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. नाशिकच्या पर्यटनाला नवी दिशा देणाऱ्या या बोट क्लबमुळे पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होणार असून, स्थानिक पर्यटन विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


