महाराष्ट्र चेंबरतर्फे ‘गाव तिथे उद्योजक’ राज्यस्तरीय उपक्रमाची घोषणा

0
61
महाराष्ट्र चेंबरतर्फे ‘गाव तिथे उद्योजक’ राज्यस्तरीय उपक्रमाची घोषणा
महाराष्ट्र चेंबरतर्फे ‘गाव तिथे उद्योजक’ राज्यस्तरीय उपक्रमाची घोषणा

महाराष्ट्र चेंबरतर्फे ‘गाव तिथे उद्योजक’ राज्यस्तरीय उपक्रमाची घोषणा

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चर (MACCIA) यांच्या वतीने ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना देण्यासाठी ‘गाव तिथे उद्योजक’ हा महत्त्वाकांक्षी राज्यस्तरीय उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत प्रत्येक तालुक्यासाठी “तालुका समन्वय उद्योजक पदाधिकारी” यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

तालुका समन्वय उद्योजक पदाधिकारी यांची भूमिका महत्त्वाची असून तालुक्यातील इच्छुक उद्योजकांची ओळख व नोंदणी करणे, गावस्तरीय बैठका, मार्गदर्शन सत्रे व प्रशिक्षण कार्यक्रमांचे समन्वय साधणे, युवक, महिला व शेतकरी उद्योजकांना संधी व योग्य मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, तसेच उपक्रमाच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवून अहवाल सादर करणे ही जबाबदारी त्यांच्यावर राहणार आहे. याशिवाय महाराष्ट्र चेंबर व स्थानिक यंत्रणांमध्ये दुवा म्हणूनही ते कार्य करणार आहेत.

ग्रामीण उद्योजकतेच्या सशक्तीकरणासाठी हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा असून महाराष्ट्र चेंबरचे इच्छुक सदस्यांनी तालुका समन्वय उद्योजक पदाधिकारी म्हणून कार्य करण्यासाठी आपली नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच पात्र व इच्छुक व्यक्तींना ही माहिती शेअर करण्याचेही आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी कुणाल कुंदर (मो. ८७७९७५८८६४ / ९९२०४६७५२६) किंवा सीए किरण भोसले (मो. ९९६७६६५१०८) यांच्याशी संपर्क साधावा किंवा संदेश पाठवावा, असे महाराष्ट्र चेंबरतर्फे कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here