मुंबईतील मनसे नगरसेवकांची नवी मुंबई मनसे कार्यालयाला भेट
मुंबईतील मनसेचे सहा नगरसेवकांनी नवी मुंबई येथील मनसे मध्यवर्ती कार्यालयास सदिच्छा भेट दिली. यावेळी मनसे नवी मुंबई जिल्हाध्यक्ष गजानन काळे यांच्या हस्ते सीवूड येथील कार्यालयात पक्षाच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला. पक्ष संघटना बळकट करण्याबाबत व आगामी राजकीय वाटचालीसंदर्भात यावेळी चर्चा झाली.


