राजपथ इन्फ्राकॉनकडून चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद; भारताच्या पायाभूत विकासाला जागतिक गौरव
रस्ते बांधकाम क्षेत्रात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, दर्जेदार बांधकाम आणि वेगवान कार्यपद्धतीच्या जोरावर राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेडने चार नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर नोंदवत भारताला जागतिक स्तरावर मानाचं स्थान मिळवून दिलं आहे. ही कामगिरी देशाच्या पायाभूत विकास क्षेत्रासाठी अत्यंत अभिमानास्पद मानली जात आहे.
या ऐतिहासिक यशाच्या पार्श्वभूमीवर राजपथ इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक, अध्यक्ष व संस्थापक श्री. जगदीश कदम यांनी सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल मनापासून अभिनंदन करण्यात आले.
भेटीदरम्यान कंपनीने रस्ते बांधकाम क्षेत्रात केलेल्या विक्रमी कामगिरीबाबत सविस्तर माहिती घेण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, वेळेचे काटेकोर नियोजन आणि उच्च दर्जाची कार्यसंस्कृती यामुळे हे यश साध्य झाल्याचे त्यांनी सांगितले. तसेच भविष्यातही देशाच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अधिक प्रभावी आणि नाविन्यपूर्ण प्रकल्प राबवण्याचा मानस व्यक्त केला.
या संवादादरम्यान देशाच्या पायाभूत विकासात मोलाचे योगदान देणाऱ्या अशा यशस्वी उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. राजपथ इन्फ्राकॉनसारख्या कंपन्यांच्या कार्यामुळे भारताची प्रतिमा जागतिक स्तरावर अधिक भक्कम होत असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
चार गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची नोंद ही केवळ कंपनीसाठीच नव्हे, तर संपूर्ण भारतासाठी अभिमानाची बाब असून, ही कामगिरी येणाऱ्या काळात पायाभूत विकास क्षेत्रात नवे मानदंड निर्माण करणारी ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला


