चेंबूरमधून स्नेहल शिवकर यांचा प्रेरणादायी विजय

0
40
चेंबूरमधून स्नेहल शिवकर यांचा प्रेरणादायी विजय
चेंबूरमधून स्नेहल शिवकर यांचा प्रेरणादायी विजय

चेंबूरमधून स्नेहल शिवकर यांचा प्रेरणादायी विजय

मुंबई :
निवडणुका फक्त पैशाच्या जोरावरच जिंकता येतात, हा गैरसमज खोडून काढणारे एक जिवंत उदाहरण म्हणजे चेंबूरमधील सुमननगर परिसरातील वॉर्ड क्रमांक १५५ मधून ओरिजनल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने निवडून आलेल्या नगरसेविका स्नेहल शिवकर.

नुकत्याच पार पडलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत सन्माननीय स्नेहल शिवकर यांनी जनतेच्या विश्वासावर आणि प्रामाणिक मेहनतीच्या बळावर दणदणीत विजय मिळवला. विशेष म्हणजे त्यांची पार्श्वभूमी ही कोणत्याही मोठ्या राजकीय घराण्याची किंवा आर्थिक बळाची नाही.

स्नेहल शिवकर या एक साध्या गृहिणी असून, त्यांचे पती विष्णू शिवकर हे रिक्षाचालक आहेत. त्याचबरोबर ते मंडप डेकोरेशनचे कामही करतात. ओरिजनल शिवसेनेचे उप-शाखाप्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी आपल्या परिसरात सातत्याने समाजसेवेचे कार्य केले आहे. राजकीय फायदा-तोटा न पाहता परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणींना ते नेहमीच धावून गेले.

याच निस्वार्थ समाजसेवेचा आणि स्थानिक नागरिकांशी निर्माण झालेल्या जिव्हाळ्याच्या नात्याचा फायदा स्नेहल शिवकर यांना निवडणुकीत झाला. चाळीत राहणाऱ्या, साध्या कुटुंबातून आलेल्या स्नेहल शिवकर यांना वॉर्ड क्रमांक १५५ मधील जनतेने मोठा आणि विश्वासार्ह पाठिंबा दिला.

या विजयाचे वैशिष्ट्य म्हणजे – कोणताही प्रचंड खर्च न करता, फक्त लोकांच्या प्रेमावर आणि विश्वासावर निवडणूक जिंकता येते, हे स्नेहल शिवकर यांनी दाखवून दिले. अनेक माध्यमांनीही त्यांच्या यशाची दखल घेत, “फक्त पैशाने निवडणूक जिंकता येत नाही; लोकांचा पाठिंबा आणि प्रामाणिक मेहनतच खऱ्या अर्थाने विजय मिळवून देते” अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

निवडणूक प्रचारादरम्यान शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे तसेच सन्माननीय आदित्यजी ठाकरे यांनी स्नेहल शिवकर यांच्या प्रचार कार्यालयाला भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

स्नेहल शिवकर यांचा हा विजय सर्वसामान्य कार्यकर्त्यांसाठी आणि समाजसेवकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here