ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

0
32
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न
ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात ध्वजारोहण संपन्न

ठाणे l प्रतिनिधी

७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते आज ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली.

या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांसह बालविवाह न करण्याची आणि समाजप्रबोधनाची प्रतिज्ञा घेतली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.

कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निनिवासी उपजिल्हाधिकारी डॉ. संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के-पाटील, शशिकांत गायकवाड, उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) रुपाली भालके, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, ठाणे प्रांताधिकारी उर्मिला पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितिन पाटील, जिल्हा हिवताप अधिकारी संतोषी शिंदे यांच्यासह तहसीलदार, नायब तहसीलदार, सहाय्यक अभियंते, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here