पुनर्वापरित प्लास्टिकपासून बनवले बाक
नवी दिल्ली l प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी मुंबई महानगरपालिकेने प्रोजेक्ट मुंबईच्या सहकार्याने पुनर्वापर केलेल्या सिंगल-यूज प्लास्टिकपासून तयार करण्यात आलेले बाक नवी मुंबईतील विविध शाळांना वितरित केले. ‘स्वच्छ आदतों से स्वच्छ भारत’ या विशेष मोहिमेअंतर्गत माननीय आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते हे बाक सुपूर्द करण्यात आले.
या उपक्रमाद्वारे ‘रिड्यूस, रियूज, रिसायकल’ (3R) या संकल्पनेचा प्रभावी प्रसार करण्यात आला असून, पर्यावरण संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती निर्माण करण्याचा उद्देश साध्य करण्यात आला आहे. या मोहिमेंतर्गत चार टनांहून अधिक सिंगल-यूज प्लास्टिक संकलित करून त्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे.या उपक्रमाचा लाभ थेट ४७ हजारांहून अधिक विद्यार्थी व नागरिकांना झाला असून, नवी मुंबईतील ५१ शाळांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग घेतला आहे.३५ पुनर्वापरित बाक शाळा, गृहनिर्माण सोसायट्या, स्वयंसेवी संस्था वितरित करण्यात येत आहेत.


