चंद्रनगर शाळेत प्रजासत्ताक दिन

0
74
चंद्रनगर शाळेत प्रजासत्ताक दिन
चंद्रनगर शाळेत प्रजासत्ताक दिन

चंद्रनगर शाळेत प्रजासत्ताक दिन

दापोली | प्रतिनिधी

दापोली तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा चंद्रनगर येथे भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात व समारंभपूर्वक साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

शाळेचे मुख्याध्यापक मनोज वेदक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रभातफेरी काढण्यात आली असून, त्याद्वारे मतदान जनजागृती करण्यात आली. चंद्रनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी ससाहित्य संगीत कवायत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच विद्यार्थ्यांनी सादर केलेले लाठीकाठीचे प्रात्यक्षिक विशेष आकर्षण ठरले.

विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे उपस्थित पालक व ग्रामस्थांनी भरभरून कौतुक केले.

सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात रत्नागिरी जिल्हा परिषद आयोजित ‘नासा–इस्रो विद्यार्थ्यांची भेट’ या स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून अमेरिकेतील नासा अभ्यास दौऱ्यासाठी निवड झालेल्या आरोही महेश मुलुख व नीरजा मनोज वेदक तसेच त्यांच्या मार्गदर्शक शिक्षिका मानसी सावंत यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान व सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे संचालन मनोज वेदक, बाबू घाडीगांवकर, मानसी सावंत व रेखा ढमके यांनी केले. यावेळी भाग्यश्री जगदाळे, रुपेश बैकर, श्रीधर जाधव, सदानंद मुलुख, राजेंद्र मिसाळ, स्वरूप मुलुख, शैलेश मुलुख, नूतन शिगवण, गौरी मुलुख, संदीप सकपाळ, अनिल मुलुख, राकेश शिगवण, प्रवीण मुलुख, अर्जुन पागडे, मनीष मुलुख, सुप्रिया परब, अपर्णा मुलुख यांच्यासह अनेक देशप्रेमी नागरिक, ग्रामस्थ, पालक तसेच विद्यालयीन व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या कार्यक्रमातून विद्यार्थ्यां मध्ये देशभक्ती, शिस्त आणि वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होत असल्याचे चित्र दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here