महावितरण कार्यालयात मा. ना. अजित पवार यांना श्रद्धांजली
महावितरणच्या कोकण परिमंडल, रत्नागिरी या कार्यालयात महाराष्ट्राचे मा. ना. उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री श्री. अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या स्वतंत्र संचालिका श्रीमती नीता केळकर, मुख्य अभियंता अनिल डोये, अधीक्षक अभियंता सुनीलकुमार माने, महाराष्ट्र चेंबर, मुंबईचे संचालक रमेश आरवाडे व कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
आज बुधवार (दि. 28) रोजी येथील कार्यालयात श्रीमती नीता केळकर यांची जिल्हा आढावा बैठक नियोजित होती. मात्र सकाळच्या सत्रात मा.ना.अजित पवार यांचे विमान अपघात वृत्तानंतर सदरची दु. 12 वाजता नियोजित असलेली बैठक रद्द करण्यात आली.


