वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेशासाठी महत्त्वाची घोषणा; नीट पी जी 2026 चे वेळापत्रक प्रसिद्ध
मुंबई l प्रतिनिधी
नीट पीजी परीक्षेचे 2026चे संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या घोषणेमुळे देशभरातील लाखो वैद्यकीय आणि दंत पदवीधर उमेदवारांना अभ्यासाचे योग्य नियोजन करता येणार आहे. नीट पीजी 2026परीक्षेचे बिगुल वाजले.
जाहीर करण्यात आलेल्या संभाव्य वेळापत्रकानुसार ‘NEET MDS 2026’ परीक्षा 2 मे 2026 रोजी होणार आहे. या परीक्षेसाठी पात्र ठरण्यासाठी उमेदवारांनी आपली इंटर्नशिप 31 मे 2026 पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. ही अट पूर्ण करणारे विद्यार्थीच परीक्षेसाठी पात्र असतील. त्याचप्रमाणे ‘NEET PG 2026’ परीक्षा 30 ऑगस्ट 2026 रोजी होण्याची शक्यता आहे. या परीक्षेसाठी वैद्यकीय अभ्यासक्रमाची आंतरवासिता पूर्ण करण्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2026 निश्चित करण्यात आली आहे.


