१ फेब्रुवारीपासून गॅस, सिगारेट महागणार, टोलनियमांत बदल
मुंबई l प्रतिनिधी
फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या तारखेपासून सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम करणारे अनेक महत्त्वाचे बदल लागू होण्याची शक्यता आहे. एलपीजी गॅस सिलेंडर, सीएनजी, हवाई इंधन, तंबाखूजन्य उत्पादने यांच्यापासून ते फास्टॅग आणि बँक सुट्ट्यांपर्यंत अनेक निर्णय १ फेब्रुवारी २०२६ पासून प्रभावी होणार असल्याने नागरिकांचे लक्ष या बदलांकडे लागले आहे.
प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेला तेल कंपन्या एलपीजी सिलेंडरच्या दरात सुधारणा करत असतात. त्यानुसार १ फेब्रुवारी २०२६ रोजी १४ किलोच्या घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे.अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर या दरवाढी किंवा कपातीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तसेच १९ किलोच्या व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या दरातही बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
एलपीजी दरांबरोबरच सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतींमध्येही बदल होण्याची
शक्यता आहे. याशिवाय एटीएफ अर्थात हवाई इंधनाच्या दरात सुधारणा होऊ शकते. गेल्या महिन्यात दिल्लीसह काही शहरांमध्ये एटीएफच्या किंमतीत सुमारे ७ टक्के कपात करण्यात आली होती. याचा परिणाम विमान तिकीट दरांवरही होतो.
दरम्यान, १ फेब्रुवारीपासून तंबाखूजन्य उत्पादने, पान मसाला आणि सिगारेटप्रेमींना मोठा आर्थिक झटका बसण्याची शक्यता आहे. नवीन एक्साइज ड्युटी लागू होण्याची शक्यता असून सध्या १८ रुपयांना मिळणारी सिगारेट तब्बल ७२ रुपयांपर्यंत महागण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI)


