अमृत उद्यान हिवाळी वार्षिक संस्करण २०२६चे उद्घाटन

0
19
अमृत उद्यान हिवाळी वार्षिक संस्करण २०२६चे उद्घाटन
अमृत उद्यान हिवाळी वार्षिक संस्करण २०२६चे उद्घाटन

अमृत उद्यान हिवाळी वार्षिक संस्करण २०२६चे उद्घाटन

नवी दिल्ली

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत अमृत उद्यान हिवाळी वार्षिक संस्करण २०२६चे उद्घाटन करण्यात आले. राष्ट्रपती भवन परिसरातील हे भव्य आणि आकर्षक उद्यान नागरिकांसाठी ३ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत खुले राहणार आहे.

अमृत उद्यान दररोज सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत नागरिकांसाठी खुले असेल. उद्यानात प्रवेश करण्याची अंतिम वेळ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ठेवण्यात आली आहे. उद्यानाची नियमित देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी दर सोमवारी उद्यान बंद राहणार असून, होळी सणानिमित्त ४ मार्च २०२६ रोजीही उद्यान बंद ठेवण्यात येणार आहे.

नागरिकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे अमृत उद्यानात प्रवेश पूर्णतः विनामूल्य ठेवण्यात आला आहे. मात्र उद्यानात प्रवेशासाठी पूर्व नोंदणी आवश्यक असून, ही नोंदणी केवळ visit.rashtrapatibhavan.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने करता येणार आहे.

फुलांची विविधता, हिरवळ, सौंदर्यपूर्ण रचना आणि निसर्गाचा अनुभव देणारे अमृत उद्यान दरवर्षी नागरिकांचे विशेष आकर्षण ठरते. हिवाळी वार्षिक संस्करणात देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने भेट देतात. यंदाही पर्यावरणप्रेमी, कुटुंबे आणि पर्यटकांसाठी अमृत उद्यान एक प्रमुख आकर्षण ठरण्याची शक्यता आहे. नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here