स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 साठी नवी मुंबई महापालिका सज्ज

0
41
स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 साठी नवी मुंबई महापालिका सज्ज
स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 साठी नवी मुंबई महापालिका सज्ज

स्वच्छ सर्वेक्षण 2025-26 साठी नवी मुंबई महापालिका सज्ज

आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचा सविस्तर आढावा

नवी मुंबई l प्रतिनिधी

‘स्वच्छ सर्वेक्षण 2025-26’ साठी स्वच्छ भारत मिशनने जाहीर केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार (Toolkit) नवी मुंबई महानगरपालिकेने तयारीला वेग दिला आहे. याअनुषंगाने महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी विभागप्रमुखांच्या आढावा बैठकीत स्वच्छतेशी संबंधित सर्व कार्यवाहीचा सखोल आढावा घेतला. बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार व डॉ. राहुल गेठे, उपआयुक्त किसनराव पलांडे, शहर अभियंता शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अधिकारी व इतर विभागप्रमुख उपस्थित होते.

आयुक्तांनी स्वच्छता ही केवळ गुणांकनापुरती न ठेवता नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवास येईल अशी असावी, असे स्पष्ट करत प्रत्येक पातळीवर जबाबदाऱ्या निश्चित करण्याचे निर्देश दिले. स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक ते वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची भूमिका ठरवून माहितीपुस्तिका तयार करून ती सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

आयुक्तांनी स्वच्छता ही केवळ गुणांकनापुरती न ठेवता नागरिकांना प्रत्यक्ष अनुभवास येईल अशी असावी, असे स्पष्ट करत प्रत्येक पातळीवर जबाबदाऱ्या निश्चित करण्याचे निर्देश दिले. स्वच्छता निरीक्षक, पर्यवेक्षक ते वरिष्ठ अधिकाऱ्यां -पर्यंत सर्वांची भूमिका ठरवून माहितीपुस्तिका तयार करून ती सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

यावर्षी ‘स्वच्छ शहर जोडी’ उपक्रमांतर्गत देशातील ७२ मार्गदर्शक शहरांची निवड झाली असून ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये समाविष्ट नवी मुंबईला महाराष्ट्रातील लोणार, केज, मलकापूर, जिंतूर व कन्नड या पाच नगरपरिषदांचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी नवी मुंबई महापालिकेचे पाच नोडल अधिकारी नेमून पुढील दोन महिन्यांत प्रत्यक्ष भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यानंतर आयुक्त व वरिष्ठ अधिकारीही भेट देणार आहेत.

महामार्ग, रेल्वे स्थानके व परिसर, बाजारपेठा, मासळी मार्केट, सार्वजनिक व सामुदायिक शौचालये, मैदानं उड्डाणपूल व बॅकलेन यांची नियमित व सखोल स्वच्छता राखण्यावर विशेष भर देण्यात आला. प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाया अधिक प्रभावी करण्यासह जनजागृती मोहिमा सातत्याने राबवण्याचे निर्देश देण्यात आले. शाळा व महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यां -मध्ये स्वच्छतेच्या सात सवयी, ‘थ्री आर’ संकल्पना आणि पर्यावरणपूरक आचरणाबाबत जागरूकता वाढवण्यावरही भर देण्यात आला.

स्वच्छताकर्मचाऱ्यांसाठी हजेरी शेड, सुरक्षा साधने, प्रथमोपचार व महिलांसाठी

मार्गदर्शक शहरांची निवड झाली असून ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये समाविष्ट नवी मुंबईला महाराष्ट्रातील लोणार, केज, मलकापूर, जिंतूर व कन्नड या पाच नगरपरिषदांचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी नवी मुंबई महापालिकेचे पाच नोडल अधिकारी नेमून पुढील दोन महिन्यांत प्रत्यक्ष भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यानंतर आयुक्त व वरिष्ठ अधिकारीही भेट देणार आहेत.

महामार्ग, रेल्वे स्थानके व परिसर, बाजारपेठा, मासळी मार्केट, सार्वजनिक व सामुदायिक शौचालये, मैदानं उड्डाणपूल व बॅकलेन यांची नियमित व सखोल स्वच्छता राखण्यावर विशेष भर देण्यात आला. प्लास्टिक प्रतिबंधात्मक कारवाया अधिक प्रभावी करण्यासह जनजागृती मोहिमा सातत्याने राबवण्याचे निर्देश देण्यात आले. शाळा व महाविद्यालयांमधून विद्यार्थ्यां -मध्ये स्वच्छतेच्या सात सवयी, ‘थ्री आर’ संकल्पना आणि पर्यावरणपूरक आचरणाबाबत जागरूकता वाढवण्यावरही भर देण्यात आला.

स्वच्छताकर्मचाऱ्यांसाठी हजेरी शेड, सुरक्षा साधने, प्रथमोपचार व महिलांसाठी मार्गदर्शक शहरांची निवड झाली असून ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये समाविष्ट नवी मुंबईला महाराष्ट्रातील लोणार, केज, मलकापूर, जिंतूर व कन्नड या पाच नगरपरिषदांचे मार्गदर्शन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यासाठी नवी मुंबई महापालिकेचे पाच नोडल अधिकारी नेमून पुढील दोन महिन्यांत प्रत्यक्ष भेटी देण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यानंतर आयुक्त व वरिष्ठ अधिकारीही भेट देणार आहेत.

प्रथमोपचार व महिलांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध आहेत का, याची खात्री करण्याच्या सूचना देत कामकाजात सुरक्षा साधनांचा वापर सुनिश्चित करण्यावर आयुक्तांनी भर दिला. नागरिकांचे अभिप्राय व तक्रारी तातडीने निकाली काढणे, ‘सिटीझन फीडबॅक’ प्रणाली प्रभावी करणे, तसेच बांधकाम-पाडकाम कचरा थेट प्रक्रिया प्रकल्पातच जाण्याबाबत जनजागृती वाढवण्याचे निर्देश देण्यात आले.

देशातील सर्वाधिक स्वच्छ शहरांच्या ‘सुपर स्वच्छ लीग’मध्ये मानांकन कायम राखण्यासाठी नवी मुंबई महापालिका पूर्ण क्षमतेने सज्ज असून, सर्व लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सहकार्याने ‘स्वच्छ सर्वेक्षण 2025-26’ यशस्वी करण्याचा निर्धार आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here