स्वतःचे दुःख बाजूला ठेवत सुनेत्रा पवारांनी जाधव कुटुंबियांचे केले सांत्वन
प्रतिनिधी
स्वतःचे अपार वैयक्तिक दुःख बाजूला ठेवत उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिवंगत विदीप जाधव यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. बारामती येथे झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह त्यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव यांचेही दुर्दैवी निधन झाले होते.
या दुःखद घटनेनंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जाधव यांच्या पत्नी व मुलांची भेट घेत त्यांना मानसिक आधार दिला. त्यांच्या डोक्यावर मायेने हात फिरवत, “कोणत्याही अडचणीत मी तुमच्यासोबत आहे,” असे शब्द सांगत त्यांनी कुटुंबियांना धीर दिला. या भेटीदरम्यान उपस्थितांचेही डोळे पाणावले असून, कर्तव्यनिष्ठ सुरक्षारक्षक विदीप जाधव यांच्या सेवाभावाची आठवण सर्वांनी आदराने व्यक्त केली.


