रत्नागिरी जिल्ह्यात ५८% मतदान
रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आज सकाळी ७.३० वाजल्यापासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मतदान शांततेत पूर्ण झाले. मात्र जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (EVM) तांत्रिक बिघाड झाल्याने मतदारांची मोठी गैरसोय झाली. काही ठिकाणी मतदान काही तासांसाठी थांबले, तर अनेक केंद्रांवर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. तरीही प्रशासनाच्या तत्परतेमुळे पर्यायी यंत्रे उपलब्ध करून देत मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीत करण्यात आली.
प्राथमिक आकडेवारीनुसार जिल्ह्यात सरासरी ५६ ते ५८ %मतदान झाले असून चिपळूण तालुक्यात सर्वाधिक मतदानाची नोंद झाली आहे.चिपळूण तालुक्यात अंदाजे ६२.६० टक्के मतदान झाले असून जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची नोंद येथे झाली आहे. नांदगाव २४/२५ मतदान केंद्रात ५५.९४ टक्के मतदान झाले.


