रत्नागिरीत शिवसेनेचा भगवा फडकला
जि.प.अध्यक्षपदी आणि पं. स. सभापतीपदी शिवसेनेचेच उमेदवार
रत्नागिरी I प्रतिनिधी
जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांनी रत्नागिरी जिल्ह्याचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलून टाकले असून, रत्नागिरी तालुक्यातील सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवत शिंदे शिवसेनेने विरोधकांचा अक्षरशः सुपडा साफ केला आहे.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी आणि पंचायत समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचेच उमेदवार विराजमान होतील, असा ठाम विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला
पत्रकार परिषदेत बोलताना सामंत म्हणाले की, आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस असून रत्नागिरी जिल्ह्यात फडकणारा भगवा हीच त्यांना दिलेली वाढदिवसाची भेट आहे. या विजयामुळे रत्नागिरी तालुक्यावर शिवसेनेचे एकहाती वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले असून, विरोधकांचे सर्व दावे मतदारांनी फोल ठरवले आहेत.
या निवडणुकीत सर्वाधिक चर्चेत असलेल्या गोळप जिल्हा परिषद गटात शिवसेनेच्या नंदा मुरकर यांनी दिग्गज नेते उदय बने यांचा पराभव करत इतिहास घडवला. गेल्या २५ ते ३० वर्षांपासून सत्तेत असलेल्या मातब्बर नेत्याला पराभूत करून नंदा मुरकर यांनी शिवसेनेची ताकद दाखवून दिली. हा विजय केवळ
एका उमेदवाराचा नसून, शिवसेनेच्या सामान्य कार्य -कर्त्यांच्या निष्ठेचा आणि मेहनतीचा विजय असल्याचे सामंत यांनी स्पष्ट केले. जि. प. आणि पं. समिती निवडणुकांच्या निकालांनी रत्नागिरी जिल्ह्याचे राजकीय चित्र पूर्णपणे बदलून टाकले असून, रत्नागिरी तालुक्यातील सर्वच्या सर्व जागांवर विजय मिळवत शिंदे शिवसेनेने विरोधकांचा अक्षरशः सुपडा साफ केला आहे.
जि.प.अध्यक्षपदी आणि पं. स. सभापतीपदी शिवसेनेचेच उमेदवार विराजमान होतील, असा ठाम विश्वास पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. हातखंबा आणि पाली गटातील चुरशीच्या लढतीकडेही सर्वांचे लक्ष होते. हातखंबा गटात सुयोग कांबळे यांनी विजय मिळवत शिवसेनेचा भगवा कायम राखला. पाली गटाबाबत बोलताना सामंत म्हणाले, “पाली जिल्हा परिषद गट हे माझे घर आहे. परशुराम कदम यांनी चांगली लढत दिली, त्यांचे मी मनापासून कौतुक करतो. संघर्ष आज संपला असून, अखेरीस जनतेने माझ्या शब्दावर आणि विकासकामांवर विश्वास ठेवला आहे.” या निकालांनी रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात नवे पर्व सुरू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.


