मालवणची लेक मुंबईची महापौर!
मालवणी भगिनी रितू तावडे हिची मुंबईच्या महापौरपदी निवड निश्चित झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आणि हार्दिक अभिनंदन. मालवणी भूमीतून आलेल्या या कर्तृत्ववान नेत्या आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे नेतृत्व करणार, ही बाब संपूर्ण मालवणीसह मुंबईकरांसाठी अभिमानास्पद आहे. सामाजिक भान, जनतेशी थेट संवाद आणि कामातील प्रामाणिकपणा ही त्यांची ओळख असून, या गुणांच्या बळावर त्या महापौरपदाची जबाबदारी समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
“मालवणी माणूस जबाबदारीत खयच कमी पडूचो नाय आणि मुंबयचो विकास होवचो” हा विश्वास त्यांच्या निवडीमुळे अधिक दृढ झाला आहे. सर्वसामान्य मुंबईकरांचे प्रश्न, पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य, महिला व युवक सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रांत सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण काम घडेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. रितू तावडे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईचा विकास अधिक वेगाने होईल आणि मालवणीच्या मेहनतीची, प्रामाणिकतेची ओळख संपूर्ण राज्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळेल, यात शंका नाही.


