नेरुळमध्ये अभिजीत देसाई कार्यालयात हळदी-कुंकू समारंभ उत्साहात संपन्न

0
23

सालाबादप्रमाणे सेक्टर २, नेरुळ, नवी मुंबई येथील मनसे नगरसेवक अभिजीत देसाई कार्यालयामध्ये हळदी-कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात व मंगलमय वातावरणात पार पडला.

नवनिर्वाचित मनसे नगरसेवक श्री. अभिजीत देसाई यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आलेल्या या पारंपरिक सोहळ्यास हजारो सुवासिनींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. वाण वाटप, तिळगुळाचा गोडवा आणि आपुलकीच्या गप्पांनी कार्यक्रमात आनंदाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते..

हा समारंभ केवळ धार्मिक-सांस्कृतिक नसून सामाजिक एकोपा आणि परंपरेचा सन्मान जपणारा ठरला. आपल्या समृद्ध संस्कृतीचा हा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावा, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.

या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात अनुष्का अभिजीत देसाई यांचे विशेष योगदान लाभले. उपस्थित महिलांनी आयोजकांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here