मतदानापूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी अजितदादाना वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली
बारामती l प्रतिनिधी
जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतदानासाठी जाण्यापूर्वी राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रावहिनी पवार यांनी राज्याचे लोकप्रिय नेते, दिवंगत श्री अजितदादा पवार यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली.
यावेळी त्यांनी अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करत नतमस्तक होत श्रद्धांजली अर्पण केली. अत्यंत भावनिक वातावरणात हा क्षण अनुभवताना त्यांनी दादांच्या आठवणींना उजाळा दिला.
राज्याच्या राजकारणात अजितदादा पवार यांनी दिलेले योगदान अतुलनीय असून, सामान्य जनतेशी असलेली त्यांची घट्ट नाळ कायम स्मरणात राहील, अशा भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनी पवार यांनी यावेळी व्यक्त केल्या. दादांचे नेतृत्व, निर्णयक्षमता आणि जनतेसाठीची तळमळ ही पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी राहील, असेही त्या म्हणाल्या. श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर सुनेत्रावहिनी पवार यांनी आपले मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदान केंद्राकडे प्रस्थान केले. या प्रसंगामुळे उपस्थित कार्यकर्ते व नागरिक भावुक झाले होते.
यावेळी उपस्थित कार्यकर्ते आणि नागरिकांनीही अजितदादांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. संपूर्ण परिसरात शांतता आणि भावनिक वातावरण अनुभवायला मिळाले.


