घावनळे श्री स्वामी समर्थ मठात २० पासून धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम

0
74
घावनळे श्री स्वामी समर्थ मठात २० पासून धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम
घावनळे श्री स्वामी समर्थ मठात २० पासून धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम

घावनळे श्री स्वामी समर्थ मठात २० पासून धार्मिक,सांस्कृतिक कार्यक्रम

श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चर्मपादुकांचे होणार आगमन

कुडाळ l प्रतिनिधी

कुडाळ श्री क्षेत्र अक्कलकोट श्री स्वामी समर्थ समाधी (मूळ स्थान) येथील श्री स्वामी समर्थ महाराजांनी वापरलेल्या मूळ चर्मपादुकांचे कुडाळ तालुक्यातील कासमळा- घावनळे येथील श्री स्वामी समर्थ मठात शुक्रवार २० फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता मिरवणुकीने आगमन होणार आहे. तसेच श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती प्रतिष्ठापणा ९ व्या वर्धापनदिना निमित्त २० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत महालक्ष्मी श्री सूक्त याग व विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

श्री वेदमूर्ती नितीन पुजारी (चोळप्पा महाराज यांचे 5वे वंशज), ब्रह्मवृंद व श्री. गुरुवर्य दादा व माउली यांच्या मार्गदर्शनाने ओम श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगड्मात परिवार श्री. स्वामी समर्थ मठ घावनळे-कासमळा यांच्या वतीने या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उत्सव कालावधीत दररोज दुपारी १२ ते ३ वाजता व रात्री ८ ते १० वाजता महाप्रसाद, सायं. ४ ते ६ वाजता कीर्तन भजन व नामस्मरण, सायंकाळी ७ वाजता आरती असे कार्यक्रम होणार आहेत.

शुक्रवार २० रोजी दुपारी २ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूळ चार्मपादुकांचे आगमन व भव्य मिरवणूक, रात्री ८ वाजता श्री सातेरी देवी महिला दशावतार नाट्य मंडळ, पावशी यांचा ‘भक्तांची पाठीराखी आदिमाया’ हा नाट्यप्रयोग.                   

शनिवार २१ रोजी सकाळी ९ वाजता महालक्ष्मी श्री सूक्त यागानिमित्त महासंकल्प, गणेश पूजन, पुण्यहवाचन,मातृका पूजन, नांदी श्राद्ध ,होम देवता स्थापना, श्री स्वामी समर्थ मूळ चर्मपादुका पूजन, अग्नी स्थापना, महानैवैद्य व आरती होणार आहे. रात्री आठ वाजता डबलबारी भजन सामना बुवा संतोष शीतकर (दिवा ठाणे) विरुद्ध सुशील गोठणकर (भांडुप-मुंबई) यांच्यात होणार आहे.

रविवार सुट्टी २२ रोजी स. ९ वा होम देवता पूजन व श्री स्वामी समर्थ मूळ चार्म पादुका पूजन,नवग्रह हवन, गणेश हवन, महालक्ष्मी हवन, महानैवेद्य व आरती होईल. सायंकाळी ७ वाजता हरिपाठ आणि रात्री ८ वाजता अमृतनाथ नाट्यमंडळ म्हापण यांचा ‘लेक माझी तुळजाभवानी’ हा नाट्य प्रयोग.                             सोमवार 23 रोजी सकाळी ९ वाजता श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला वर्धापन दिनानिमित्त महास्तकाभिषेक, महालक्ष्मी हवन, स्वामी गायत्री हवन, महानैवेद्य,व आरती होईल. सायं ६ वा. तबला सोलो (मयांक बेडेकर ) ७ वा.पालखी सेवा आणि रात्री ९ वा.श्री देव कलेश्वर नाट्यमंडळ नेरूंरचे जोगुलांबा अर्थात काल सर्प भैरवी हा ट्रिकसीनयुक्त नाट्यप्रयोग.     

मंगळवार 24 रोजी स.७ वा.श्री स्वामी समर्थ मूळ चर्मपादुका पूजन, होम,देवता पूजन ९ वा . प्रायश्चित हवन, बलीपूजन, पूर्णाहुती, महानैवेद्य व आरती होईल. रात्री ८ वा दशावतारी नाट्यप्रयोग,                                  बुधवार २५  रोजी सकाळी सात वाजता स्वामी समर्थ महाराजांच्या सामूहिक भक्तगणांकडून अभिषेक ,९ वा गंगापूजन व कुंभमेळा,रात्री ८ वा.श्री सावरेश्वर नाट्यमंदिर ( आवेरा )यांचा श्री क्षेत्र गाणगापूर नाट्यप्रयोग.     गुरुवार २६ रोजी स. १० वा. कार्यक्रमाची सांगता निमित्त पूजन वाजता पायाची अहवाल्ली पूजा पूर्ण होते महानिर्वैद्य व आरती आठ वाजता दशावतांना व जन्म कुंभमेळा रात्री आठ वाजता श्री सत्यनारायण महापूजा, महानैवेद्य व आरती होणार आहे. सायं ६ वा. पालखी सेवा रात्री ७ वा. गोपाळकाला ८ वा.जय हनुमान नाट्यमंडळ (ओरोस-दंडेली) यांचा ‘दख्खनचा राजा ज्योतिबा माझा’ हा नाट्यप्रयोग सादर होणार आहे. सर्व स्वामी भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन श्री सद्गुरू स्वामी समर्थ जगद्गाता परिवार घावनळे-कासमळायांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here