दापोली कृषी विद्यापीठात युवासंवाद

0
62
दापोली कृषी विद्यापीठात युवासंवाद
दापोली कृषी विद्यापीठात युवासंवाद

दापोली कृषी विद्यापीठात युवासंवाद

रत्नागिरी l प्रतिनिधी

रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील कृषी विद्यापीठात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वतीने युवासंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष मा. सिद्धेशजी कदम तसेच सदस्य सचिव मा. देवेंद्रसिंह (भा.प्र.से.) यांनी विद्यापीठाला भेट देत विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.

हवामान बदल हे कृषी क्षेत्रापुढील मोठे आव्हान’ या विषयावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. वाढते तापमान, अनियमित पर्जन्यमान, नैसर्गिक आपत्ती आणि त्याचा पिकांवर होणारा परिणाम याविषयी त्यांनी माहिती दिली. बदलत्या हवामान परिस्थितीत शाश्वत शेतीपद्धती, जलसंधारण, मृदा संवर्धन आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

विद्यार्थ्यांनीही विविध प्रश्न उपस्थित करत आपले शंकानिरसन करून घेतले. कृषी शिक्षण घेत असताना पर्यावरणाची जाणीव आणि जबाबदारी यांची जोड देणे आवश्यक असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. या संवादातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण आणि कृषी विकास यामधील परस्परसंबंध समजून घेण्यास महत्त्वपूर्ण दिशा मिळाली. या कार्यक्रमास विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here