जिल्हाधिकाऱ्यांची कशेळी खाडी पूल व प्रमुख रस्ते कामांची पाहणी
ठाणे l प्रतिनिधी
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी कशेळी खाडी पूल, दिवे अंजुर येथील अंडरपास तसेच लोढा धाम परिसरातील रस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी करून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला. वाहतूक सुलभता, नागरिकांची सुरक्षितता आणि कामांची गुणवत्ता याबाबत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.
पूल व अंडरपास परिसरातील वाहतुकीची स्थिती, पावसाळ्यातील संभाव्य अडचणी आणि पर्यायी मार्गांची तयारी याबाबतही त्यांनी माहिती घेतली. कामे वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्याचे निर्देश देत नागरिकांना कमीत कमी त्रास होईल याची खबरदारी घेण्यावर भर देण्यात आला.
यावेळी वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, भिवंडी प्रांताधिकारी अमित सानप तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


