सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

0
43
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद
सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस भरतीला उत्स्फूर्त प्रतिसाद

सिंधुनगरी l प्रतिनिधी

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील ८७ रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या भरती प्रक्रियेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आहे. अवघ्या ८७ पदांसाठी तब्बल ७,२९८ अर्ज प्राप्त झाल्याने स्पर्धा चुरशीची ठरणार आहे. यात ७८ पोलीस शिपाई व ९ पोलीस शिपाई चालक पदांचा समावेश आहे.

२० व २१ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या भरती टप्प्यात १,५०६ उमेदवारांना बोलावण्यात आले होते. त्यापैकी १,१७५ उमेदवार प्रत्यक्ष हजर राहिले. दोन दिवसांत १,०६८ उमेदवार शारीरिक चाचणीस पात्र ठरले असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

पोलीस शिपाई पदासाठी ४,०८३ तर चालक पदासाठी ३,२१५ उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. पात्र उमेदवारांचे शारीरिक मोजमाप व मैदानी चाचण्या २० ते २८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत टप्प्याटप्प्याने घेतल्या जाणारआहेत. प्रथम प्रवेश व मोजमाप प्रक्रिया जिल्हा होमगार्ड कार्यालय, सिंधुदुर्गनगरी येथे सुरू असून मैदानी चाचणी पोलीस मुख्यालयाच्या परेड ग्राऊंडवर पार पडत आहे.

भरती प्रक्रिया पूर्णतः पारदर्शक ठेवण्यात आली असून सीसीटीव्ही व ड्रोनद्वारे संपूर्ण परिसरावर कडक निगराणी ठेवण्यात येत आहे. उमेदवारांनी प्रवेशपत्रावरील दिनांक व वेळेनुसार उपस्थित राहून स्पोर्ट्स शूजचा वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांची कागदपत्रांची काटेकोर पडताळणी केली जात असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तत्काळ कारवाई केली जाणार असल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सर्व प्रक्रिया शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पार पाडली जात आहे.

दरम्यान, मोठ्या संख्येने उमेदवार सहभागी होत असल्याने जिल्ह्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस दलात सेवा देण्याची संधी मिळावी यासाठी युवक-युवतींमध्ये प्रचंड स्पर्धा असून अंतिम निवड यादीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अंतिम लेखी परीक्षेची तारीख व पुढील टप्प्यांबाबतची माहिती अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार असून उमेदवारांनी वेळोवेळी अद्ययावत माहिती तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे. गुणवत्ता व पारदर्शकतेच्या आधारेच अंतिम निवड करण्यात येणार असल्या चेही स्पष्ट करण्यात आले.भरती प्रक्रियेत कोण -त्याही अफवा किंवा बनावट संदेशांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांच अनुसरावे, असेही आवाहन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here