नगरपरिषद गट-क व गट-ड पदभरती २०२६ ची घोषणा
मुंबई l प्रतिनिधी
नगरपरिषद गट-क आणि गट-ड पदभरती २०२६ संदर्भात आज दिनांक २३ फेब्रुवारी २०२६ रोजी महत्त्वाची माहिती जाहीर करण्यात आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही भरती प्रक्रिया मोठी संधी ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
राज्यातील विविध नगर -परिषदांमधील रिक्त पदे भरण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. पात्रता निकष, अर्ज सादर करण्याची पद्धत, परीक्षा स्वरूप तसेच संभाव्य वेळापत्रक याबाबतची सविस्तर माहिती लवकरच अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तयारी सुरू ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून इच्छुक उमेदवारांनी नियमितपणे संकेतस्थळ तपासावे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून शासकीय सेवेत प्रवेश मिळवू इच्छिणाऱ्या युवकांसाठी ही भरती महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी वेळेचा योग्य वापर करून तयारीला लागावे, असे आवाहन करण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी परीक्षा प्रक्रिया संगणकीकृत पद्धतीने होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


