उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांना महापौरांचा इशारा
जळगाव l प्रतिनिधी
जळगावच्या महापौर दीपमाळा काळे यांनी सोमवारी सकाळी पावणे दहा वाजताच महापालिकेच्या आवारात अचानक हजेरी लावून उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची कानउघाडणी केली. कामकाजाच्या वेळेनंतर कार्यालयात दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली.
महापालिकेच्या विविध विभागांतील उपस्थितीची पाहणी करताना काही कर्मचारी नियोजित वेळेनंतर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यावेळी त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना समज देत कामावर वेळेत उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या.
यापुढे सर्वांनी वेळेचे काटेकोर पालन करावे. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल,” असा स्पष्ट इशारा महापौरांनी दिला. नागरिकांची कामे वेळेत आणि सुरळीत पार पडावीत यासाठी कार्यालयीन शिस्त अत्यावश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.
महापौरांच्या या अचानक पाहणीमुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले .
“


