रत्नागिरीती निवेंडी-धामणसेत औद्योगिक क्षेत्रासाठी जमीन संपादन आराखडा जाहीर

0
42
अधिकारी कार्यालयात सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष सुनावणी हवी असल्यास सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हजर राहून आपले म्हणणे मांडता येणार आहे. प्रशासनाने सांगितले की, हरकतींची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही करून संबंधित जमिनींचा ताबा घेण्यात येईल. औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीमुळे परिसरातील रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, या प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळाल्यास परिसरातील पायाभूत सुविधा, रस्ते, वीज व पाणीपुरवठा यामध्येही सुधारणा होणार असून ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला नवे बळ मिळेल, असे प्रशासनाच्या वर्तुळातून सांगण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी रत्नागिरी तालुक्या -तील निवेंडी आणि धामणसे येथील जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम १९६१ च्या कलम ३२ (२) अन्वये रत्नागिरीचे उपविभागीय अधिकारी यांनी यासंदर्भातील अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.

अधिसूचनेनुसार निवेंडी गावातील सुमारे १.९२ हेक्टर तर धामणसे गावातील २.७९ हेक्टर जमीन औद्योगिक वापरासाठी निश्चित करण्यात आली आहे. निवेंडी येथील सर्व्हे क्रमांक ३६, ३७, ४३, ४५ तसेच धामणसे येथील सर्व्हे क्रमांक १०५ व १६९ मधील ठरावीक हिस्सा यामध्ये समाविष्ट आहे. या जमिनींवर भविष्यात उद्योगधंदे उभारणे तसेच औद्योगिक वसाहतीसाठी आवश्यक सोयीसुविधा विकसित करण्याचा मानस आहे.

अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित जमिनींची विक्री, हस्तांतरण, गहाण व्यवहार किंवा कोणतेही नवे बांधकाम यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. या कालावधीत कोणीही जमीन व्यवहार केल्यास अथवा सुधारणा केल्यास त्याबाबत कोणतीही भरपाई दिली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच भूसंपादन कायदा २०१३ नुसार जमिनीचा ताबा घेताना योग्य ती भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

या निर्णयाबाबत हरकत नोंदवू इच्छिणाऱ्या जमीन मालकांना आणि संबंधितांना १५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यांनी आवश्यक पुराव्यांसह आपले लेखी म्हणणे रत्नागिरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रत्यक्ष सुनावणी हवी असल्यास सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत हजर राहून आपले म्हणणे मांडता येणार आहे.

प्रशासनाने सांगितले की, हरकतींची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर पुढील कार्यवाही करून संबंधित जमिनींचा ताबा घेण्यात येईल. औद्योगिक क्षेत्राच्या उभारणीमुळे परिसरातील रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

दरम्यान, या प्रस्तावित औद्योगिक क्षेत्रामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लघु व मध्यम उद्योगांना चालना मिळाल्यास परिसरातील पायाभूत सुविधा, रस्ते, वीज व पाणीपुरवठा यामध्येही सुधारणा होणार असून ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला नवे बळ मिळेल, असे प्रशासनाच्या वर्तुळातून सांगण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here