बाळकृष्ण तावडे यांना ‘मी मराठी राजभाषा स्वाभिमान गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान

0
46

मुंबई l प्रतिनिधी

मराठी भाषा व संस्कृतीच्या जतनासाठी कार्य करणाऱ्या मी मराठी लोक चळवळ अभियान, मैत्री संस्था आणि उद्देशक फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बाळकृष्ण दाताराम तावडे यांना ‘मी मराठी राजभाषा स्वाभिमान गौरव पुरस्कार २०२६’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

समाजकार्य आणि राष्ट्रविकासासाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा पुरस्कार तावडे यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्याकार्यातून मराठी भाषा, संस्कृती आणि समाजाच्या उन्नतीसाठी सातत्याने योगदान दिल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला .

ज्येष्ठ साहित्यिक व लेखक मधू मंगेश कर्णिक आमदार रोहित पवार, मुंबई महानगरपालिकेच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर तसेच कवी व मुक्त पत्रकार प्रकाश जाधव यांनी साक्षांकित केलेले सन्मानपत्र देण्यात आले आहे.. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या प्रसारासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींना दरवर्षी या उपक्रमांतर्गत गौरविण्यात येते.

१ मार्च २०२६ रोजी मुंबई येथे आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार जाहीर करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here