ऋतुजा गायकवाड UPSC मध्ये १०६ वा क्रमांक

0
65
ऋतुजा गायकवाड UPSC मध्ये १०६ वा क्रमांक
ऋतुजा गायकवाड UPSC मध्ये १०६ वा क्रमांक

ऋतुजा गायकवाड UPSC मध्ये १०६ वा क्रमांक

संगमनेर :

तालुक्यातील नान्नज दुमाला येथील श्री. अशोक लक्ष्मण गायकवाड यांची कन्या कु. ऋतुजा अशोक गायकवाड हिने २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या संघ लोक सेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवले आहे. ऋतुजाने या परीक्षेत ऑल इंडिया १०६ वा क्रमांक मिळवत भारतीय प्रशासकीय सेवेसाठी (IAS) आपली निवड निश्चित केली आहे.

ग्रामीण भागातून पुढे येत ऋतुजाने कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण संगमनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून हे यश तालुक्यासाठीअभिमानाची बाब ठरत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here