विदर्भासाठीच्या अर्थसंकल्पीय तरतुदींवरील घडी पुस्तिकेचे फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन
नागपूर : महाराष्ट्र शासनाच्या आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये विदर्भासाठी करण्यात आलेल्या विविध तरतुदींवर आधारित घडी पुस्तिकेचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथील रामगिरी शासकीय निवासस्थानावर करण्यात आले.
माहिती व जनसंपर्क विभागाच्या नागपूर विभागीय माहिती संचालक कार्यालयाने या घडी पुस्तिकेची निर्मिती केली आहे. या पुस्तिकेमध्ये विदर्भातील कृषी, आरोग्य, उद्योग, शिक्षण तसेच पायाभूत सुविधांशी संबंधित अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती आकर्षक आणि वैविध्यपूर्ण ग्राफिक्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
ही पुस्तिका विविध शासकीय कार्यालये तसेच प्रसार माध्यमांसाठी संदर्भ म्हणून उपयुक्त ठरणार असल्याचे सांगण्यात आले.
या प्रसंगी नागपूर-अमरावती विभागाचे संचालक डॉ. गणेश मुळे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.


