गुढीपाडवा स्वागतयात्रेनिमित्त डोंबिवलीत वाहतूक बदल; पोलिसांचे नागरिकांना आवाहन
डोंबिवली : गुढीपाडवा निमित्त आयोजित नववर्ष स्वागतयात्रेमुळे डोंबिवली पश्चिम परिसरात वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची माहिती Dombivli Traffic Police यांनी दिली आहे. ही स्वागतयात्रा १९ मार्च २०२६ रोजी सकाळी ६.३० वाजता भागशाळा मैदान येथून सुरू होऊन कोपर ब्रिज मार्गे फडके रोड, बाजीप्रभु चौक परिसरात येणार आहे.
यात्रेदरम्यान लेझीम पथक, सनई-चौघडा, भजन तसेच विविध चित्ररथांचा समावेश असणार असल्याने लो. टिळक चौक, गणपती मंदिर रोड, छेडा रोड, फडके रोड, मदन ठाकरे चौक आणि बाजीप्रभु चौक परिसरात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
त्यामुळे नागरिकांनी शक्यतो पर्यायी मार्गांचा वापर करून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.


