रत्नागिरीत २४ मार्चला ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’; बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी

0
24
पंजाब अँड सिंध बँक स्थानिक बँक मध्ये १,००० स्थानिक बँक अधिकारी पदांसाठी भरती
पंजाब अँड सिंध बँक स्थानिक बँक मध्ये १,००० स्थानिक बँक अधिकारी पदांसाठी भरती

रत्नागिरीत २४ मार्चला ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’; बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी

रत्नागिरी : जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी २४ मार्च रोजी ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत नाचणे रोड येथील लोकमान्य बाळ गंगाधर टिळक शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे पार पडणार आहे.

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र आणि आयटीआय यांच्या संयुक्त विद्यमाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. विविध उद्योग, कंपन्या आणि संस्थांकडून रिक्त पदांसाठी उमेदवारांची थेट मुलाखत घेण्यात येणार आहे.

या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी MahaSwayam Portal या संकेतस्थळावर नोंदणी करणे अनिवार्य आहे. यापूर्वी नोंदणी केलेल्या उमेदवारांनी आपले प्रोफाईल अद्ययावत करून युजर आयडी व पासवर्डच्या साहाय्याने मेळाव्यासाठी स्वतंत्र नोंदणी करावी.

मेळाव्याच्या दिवशी उमेदवारांनी अद्ययावत बायोडेटा तसेच सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रांच्या प्रतींसह मुलाखतीसाठी उपस्थित राहणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रभारी सहाय्यक आयुक्त मोरेश्वर दुधाळ यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here