”आपण व्यक्त होऊया!” तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद

0
70
''आपण व्यक्त होऊया!'' तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद
''आपण व्यक्त होऊया!'' तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद

”आपण व्यक्त होऊया!” तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद

सावंतवाडी : स्व. श्रीमंत कमलाबाई दत्ताजीराव भोसले तळीकर प्रतिष्ठान व सावंतवाडी नगरपरिषदेच्या ‘माझी वसुंधरा अभियान’ यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. प्रा. मिलिंद द. भोसले स्मृतीप्रीत्यर्थ ”आपण व्यक्त होऊया!” समितीकडून आयोजित तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला. जनरल जगन्नाथराव भोसले शिव उद्यान येथे ही स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. रंगभरण स्पर्धेत धन्विका सचिन मुळीक तर चित्रकला स्पर्धेत प्रार्थना प्रणय नाईक प्रथम क्रमांकांचे मानकरी ठरले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.

''आपण व्यक्त होऊया!'' तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद
”आपण व्यक्त होऊया!” तालुकास्तरीय रंगभरण व चित्रकला स्पर्धेला उदंड प्रतिसाद

इयत्ता पहिली ते दुसरीसाठीच्या रंगभरण स्पर्धेच आयोजन करण्यात आले होते. यामध्ये धन्विका सचिन मुळीक प्रथम, हर्षिता प्रवीण मुळीक द्वितीय, स्वराली विश्वेश‌ पांगम तृतीय, हार्दिक अमोल भिरवंडेकर, दिक्षा पराग टिळवे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केले. तर इ. तिसरी व चौथीसाठी आयोजित चित्रकला स्पर्धेत प्रथम क्रमांक प्रार्थना प्रणय नाईक, सार्थक स्नेहल मालवणकर द्वितीय, आराध्या अभिजित चव्हाण तृतीय तर आरोही विनोद गावडे, अन्वी विनोद गावडे यांनी उत्तेजनार्थ क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेचे परिक्षण कलाशिक्षक बी. व्ही. मालवणकर, चित्रकार अक्षय सावंत यांनी केल. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पारितोषिक वितरण करण्यात आले. तसेच स्व. किशोर दत्ताजीराव भोसले स्मृती आरोग्य व सामाजिक सेवा पुरस्कार ‘सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठान, सावंतवाडी’ यांना प्रदान करण्यात आला. संस्थेचे सदस्य रवी जाधव, रुपा मुद्राळे,हेलन निब्रे, समीरा खलील, लक्ष्मण कदम यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी सावंतवाडीचे प्र. नगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी प्राचार्य व्ही. बी. नाईक, उद्यान सभापती मोहिनी मडगावकर, सामाजिक कार्यकर्ते ॲड. नकुल पार्सेकर, कोमसाप अध्यक्ष दीपक पटेकर, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, प्रतिष्ठानचे विश्वस्त अनिल भोसले, संचालिका मंगल भोसले, शोभा भोसले, मानसी भोसले, नमिता भोसले, सोमा सावंत आदी उपस्थित होते.

दरम्यान, या स्पर्धेला माजी शालेय शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी भेट देत शुभेच्छा दिल्या. स्व. प्रा. मिलिंद भोसले यांच्या जाण्याने सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य क्षेत्रात मोठी हानी झाली. त्यांचा वारसा भोसले- तळीकर प्रतिष्ठान पुढे घेऊन जात आहे ही बाब कौतुकास्पद असल्याचे उद्गार श्री. केसरकर यांनी काढले. त्यांच्या हस्ते स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक संजू परब, शिवसेना तालुकाप्रमुख दिनेश गावडे आदी उपस्थित होते. बक्षीस वितरण प्रसंगी प्र. नगराध्यक्ष ॲड अनिल निरवडेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब यांनीही मनोगत व्यक्त केली. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी गौरव भोसले, प्राजक्ता पाटील, सुलक्षणा चव्हाण, शिवम धुरी तसेच आपण व्यक्त होऊया समितीचे सर्वेश राऊळ, अविनाश बांदेकर, समर्थ केळुसकर, गोविंद मळगावकर, अनिकेत मळगावकर, मंगेश मेस्त्री, हर्षा सावंत, ऋतुजा सावंत, नेहा दळवी, समृद्धी सावंत, केतकी सावंत, ऋषिकेश केळुसकर यांनी विशेष परिश्रम घेतले. स्पर्धेचे निवेदन संचालक विनायक गांवस यांनी केले. तर आभार आपण व्यक्त होऊया समितीचे प्रमुख निरज भोसले यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here