मतिमंद, कर्णबधिर मुलांसोबत वाढदिवस साजरा

0
94
मतिमंद, कर्णबधिर मुलांसोबत वाढदिवस साजरा
मतिमंद, कर्णबधिर मुलांसोबत वाढदिवस साजरा

मतिमंद, कर्णबधिर मुलांसोबत वाढदिवस साजरा

सावंतवाडी : आरोंस-दांडेली येथील माऊली मतिमंद व कर्णबधिर मुलांची शाळा व वसतिगृह येथे सामाजिक बांधिलकी जपत प्रशांत माजरेकर यांनी आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. समाजातील वंचित घटकांबद्दल संवेदनशीलता ठेवत त्यांनी हा वाढदिवस मतिमंद व कर्णबधिर मुलांसोबत साजरा करत त्यांना आनंदाचे क्षण दिले. या निमित्ताने प्रशांत माजरेकर यांनी संस्थेला भेट देत तेथील मुलांसोबत संवाद साधला. मुलांच्या उपस्थितीत केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी मुलांना खाऊचे वाटप करून त्यांच्यासोबत आनंदाचे क्षण शेअर करण्यात आले. तसेच संस्थेच्या कार्याला हातभार लागावा या उद्देशाने शाळेला रोख रक्कम स्वरूपात आर्थिक मदतही करण्यात आली. या कार्यक्रमात मुलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी संस्थेच्यावतीने प्रशांत माजरेकर यांचे आभार मानण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here